ज्या अंधश्रद्धेविरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं
त्याच अंधश्रद्धेचा वापर करून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचं बिनडोक काम
पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्तांनी केल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते
आशिष खेतान यांनी केला आहे.
आऊटलुक या मासिकामध्ये छापून आलेल्या लेखामध्ये आशिष खेतान यांनी गुलाबराव पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रतापाचा लेखाजोखा मांडला आहे.
दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा छडा लागत नाही, असं दिसल्यानंतर पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी चक्क प्लॅन्चेटचा विधी केला. माजी पोलिस अधिकारी रणजित अभ्यंकर यांच्या साथीनं प्लॅन्चेटची विधी केल्याचा दावा खेतान यांनी केला आहे. ही माहिती खुद्द पोळ यांनीच आपल्याला दिल्याचंही खेतान यांनी सांगितलं आहे.
या तंत्र-मंत्राच्या विधीसाठी पोळ यांना साथ मिळाली ती निवृत्त पोलिस हवालदार मनिष ठाकूर यांनी. विशेष म्हणजे हा सगळा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या पोलिस आयुक्तालयात झाल्याचा दावाही खेतान यांनी केला आहे.
जेव्हा हा विधी सुरु झाला त्यावेळी मनिष ठाकूर यांच्या अंगात डॉ. दाभोलकरांचा आत्मा आला आणि त्यांनी आपल्यावर हल्ला होण्याच्या आदल्या दिवशीचा घटनाक्रमही सांगितला. अशी माहिती पोलिस आयुक्त पोळां यांनी खेतान यांना सांगितल्याचं आऊटलूक मासिकातील लेखात दिली आहे.
दरम्यान हे सगळे आरोप निराधार असल्याचा दावा गुलाबराव पोळ यांनी केला असून खेतान यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं पोळ यांनी सांगितलं आहे.

No comments:
Post a Comment