फिजिओथेरपीमध्ये भरघोस संधी
बायोलॉजीची एक शाखा म्हणजे फिजिओथेरपी. रोजच्या आयुष्यात आपल्या शरीराची हालचाल नीट होणं आवश्यक असतं. प्रत्येक अवयवाचं कार्य पूर्ण क्षमतेने व्हावं लागतं. पण काही वेळेस अपघात किंवा अशाच काही प्रसंगांमुळे अवयव, सांधे आखडतात किंवा दुखावतात. अशा वेळी त्या अवयवांना किंवा सांध्यांना पुन्हा सुधारण्याचं काम फिजिओथेरपिस्ट करतात. नर्सेस आणि अॅक्युपेशनल थेरपिस्ट यांसारख्या हेल्थ प्रोफेशनल्सबरोबरही फिजिओथेरपिस्ट काम करतात.स्पेशलायझेशन :
1. कार्डिओपलमोनरी फिजिओथेरपिस्ट:
अस्थमा, छातीमधील संसर्ग तसेच, मोठ्या सर्जरीनंतर पेशंटना स्वत:ची तब्येत सुधारण्यासाठी सहाय्य करण्याचे काम हे तज्ज्ञ करतात. हृदयासंबंधित आजार आणि श्वसनाच्या आजारांमधून बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरपिस्ट मदत करतात.
२. गेरिअॅट्रिक फिजिओथेरपिस्ट :
वय वाढल्यामुळे वृद्धांमध्ये येणाऱ्या समस्या सोडवणं आणि त्यांच्या शरीराचं कार्य अधिक कार्यक्षमतेने सुरू राहण्यासाठी हे तज्ज्ञ मदत करतात.
३. मस्क्यूलोस्केलेटल फिजिओथेरपिस्ट :
हे तज्ज्ञ स्नायूंच्या बिघडलेल्या हालचालींचं निरीक्षण करून, पेशंटची मेडिकल हिस्ट्री अभ्यासून त्याला बरं करतात.
४. न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपिस्ट :
मेंदूशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी न्यूरोलॉजिकल फिजिओथेरपिस्ट मदत करतात.
५. पीडियॅट्रिक फिजिओथेरपिस्ट :
हे तज्ज्ञ लहान मुलांमधील समस्या सोडवतात.
६. स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट :
खेळाडूंना येणाऱ्या समस्या सोडवण्याचं काम स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट करतात.
फिजिओथेरपी या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर बारावी सायन्सनंतर डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री करता येईल. बॅचलर डिग्री कोर्सला प्रवेश घेण्यासाठी संबंधित प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
फिजिओथेरपिस्ट कोर्स उपलब्ध असणाऱ्या संस्था :
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, अॅक्युपेशनल थेरपी
वेबसाइट : www.dypatil.com
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन
वेबसाइट : www.aiipmr.gov.in
स्कूल ऑफ फिजिओथेरपी, ऑर्थोपेडिक सेंटर, केईएम हॉस्पिटल,
वेबसाइट : www.kem.edu
स्कूल ऑफ फिजिओथेरपी, बीवायएल नायर हॉस्पिटल
वेबसाइट : www.nair.edu
No comments:
Post a Comment