एमपीएससीमार्फत कृषी सेवेतील ४०४ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा
आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा (पूर्व) परीक्षेची घोषणा करण्यात आली
आहे. या अंतर्गत महाराष्ट्र कृषी सेवा गट अ (४० जागा), महाराष्ट्र कृषी
सेवा गट ब (१२८ जागा), महाराष्ट्र कृषि सेवा गट ब-कनिष्ठ (२३६ जागा) ही पदे
भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २०११ आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १८ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली
आहे. अर्ज व अधिक माहिती
http://www.facebook.com/l/3fd654Ybxs2XjyNkNcclPVzhOYw/www.mpsc.gov.in व
http://www.facebook.com/l/3fd65G-NEp7QNSmqV9XiBtecW2w/www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात तलाठी पदाच्या ७ जागा
मुंबई उपनगर जिल्ह्यातील
उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील तलाठी (७ जागा) हे पद भरण्यात
येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०११ आहे. यासंबंधीची
सविस्तर जाहिरात दै. सामनामध्ये दि. १८ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती
http://www.facebook.com/l/3fd65LxYK5bL5Be3Xj2EO_usVIg/www.mumbaisuburban.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात २१ जागा
महाराष्ट्र
विद्युत नियामक आयोगात कार्यकारी संचालक (१ जागा), संचालक-प्रशासन व वित्त
(१ जागा), संचालक- विद्युत अभियांत्रिकी (१ जागा), संचालक-वीज दर (१
जागा), संचालक-विधी (१ जागा), उपसंचालक-प्रशासन व वित्त (४ जागा),
उपसंचालक-तांत्रिक (८ जागा), उपसंचालक-विधी (४ जागा) ही पदे भरण्यात येणार
आहेत. अर्ज १ ऑगस्ट २०११ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती
http://www.facebook.com/l/3fd65d21IAKcIhSi8PPFMojJqxQ/www.mercindia.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकमत व लोकसत्तामध्ये दि. १५ जून २०११ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारतीय स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या ४९८७ जागा
भारतीय स्टेट बँकेत
स्पेशालिस्ट ऑफिसर केडरमध्ये व्यवस्थापक-विधी (१६ जागा),
व्यवस्थापक-इकॉनॉमिस्ट (२ जागा), उपव्यवस्थापक-इकॉनॉमिस्ट (२ जागा),
उपव्यवस्थापक-सुरक्षा (३० जागा), सहायक व्यवस्थापक-सिस्टिम (१०० जागा),
सहायक व्यवस्थापक-विधी (१५ जागा जागा), स्थायी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
(४१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची
शेवटची तारीख ३० जून २०११ आहे. अधिक माहिती
http://www.facebook.com/l/3fd65jH4aNI1NF5b0zUhp11AcdA/www.sbi.co.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment