Wedding management
वेडिंग मॅनेजमेंट
पूर्वीच्या काळी लग्न हा
घरगुती प्रकार होता. हे क्षेत्र कमर्शियल झालं नव्हतं आणि ते असंघटित होतं.
आता मात्र लग्न करवून देणं हा एक उद्योग झाला आहे. या उद्योगाची क्षमता
आणि त्यातील संधी लक्षात घेऊन बरेच उद्योजक यात उडी मारत आहेत. भारतीय
संस्कृतीत विवाहाचे एक विशिष्ट स्थान आहे. पण हा उद्योग म्हणून एका
दशकापूर्वी उदयाला आला आहे. हा उद्योग फायदेशीर आहे हे खरे असले तरी तो
वाढतोय याचे कारण त्यातली चमकधमक आणि मोहकता होय. वेडिंग मॅनेजर हे
लग्नाच्या आमंत्रण पत्रिकांपासून , लग्नाचे स्थळ , रंगमंच वा स्टेजची सजावट , नृत्य , गायक , खाद्यपेयाची व्यवस्था ते कपडे आणि संपूर्ण समन्वयाचे काम पाहतात.
वैशिष्ट्ये
स्वतःहून पुढे होऊन काम करणे
नीटनेटके आणि चुणचुणीत असणे
इतरांमध्ये मिसळता यावे
समोरच्याच्या गरजा लक्षात घेणे
तपशीलवार आणि व्यवस्थित असणे
ग्राहक सेवा देणे
उत्तम शारीरीक आणि मानसिक क्षमता
कल्पक आणि अभिनव/ नाविन्यपूर्ण
प्रशिक्षण
या उद्योगाकरीता विशेष शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते , परंतु आपली डिग्रीही या क्षेत्रात आपल्याला मदत करते. हल्लीच्या काळात वेडिंग प्लॅनिंगमध्ये ,
इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आपण शॉर्ट टाइम वा पार्ट टाइम प्रोग्राम करू शकतो.
या क्षेत्रात कोणत्याही डिग्री वा डिप्लोमाखेरीजही तुमच्या गुणवत्ता आणि
बुद्धिमत्तेच्या आधारे तुम्ही ग्राहकांच्या मनावर आपला ठसा उमटवू शकता.
भविष्यातील संधी
एक वेडिंग मॅनेजर म्हणून तुम्हालाच संपूर्ण कामकाज पहावे लागते. उदा. कॅटरिंग , डिझायनिंग , डेकोरेशन , संपूर्ण इव्हेंट वा कार्यक्रमाचे नियोजन आदी. एक चांगला कूक भविष्यात स्वतःचा कॅटरिंग व्यवसाय वा हॉटेल सुरू करू शकतो , तर एखादा डिझायनर स्वतःचे बुटिक उघडू शकतो.
शैक्षणिक संस्था
इव्हेंट मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (इएमडीआय) वांद्रे , मुंबई
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट(एनआयइएम) विलेपार्ले , मुंबई
कॉलेज ऑफ इव्हेंट आणि मॅनेजमेंट (सीओइएम) पुणे
स्कायलाइन बिझनेस स्कूल , नवी दिल्ली
इव्हेंट मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट(इएमडीआय) पुणे
No comments:
Post a Comment