महाराष्ट्र आरोग्य विभागात परिचारिकांना संधी
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागात अधिपरिचारिकांच्या जागा खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत .
जागांची संख्या : उपलब्ध जागांची संख्या ९२ . यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव .
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी नर्सिंगमधील पदवी पात्रता उत्तीर्ण केलेली असावी व त्यांची महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी झालेली असावी .
वयोमर्यादा : ३३ वर्षे . राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथीलक्षम .
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना निवड परीक्षा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांची अंतिम निवड करण्यात येईल .
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून ४०० रुपये रोखीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत ऑनलाइन पद्धतीने भरावेत .
वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या उमेदवारांना राज्य सरकारच्या आरोग्यसेवेत अधिपरिचारिका म्हणून दरमहा ९ , ३०० - ३४ , ८०० + ४ , २०० या वेतनश्रेणीत इतर भत्ते व फायद्यांसह नेमण्यात येईल .
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडच्या mahaarogya.gov.in किंवा oasis.mkcl.org/dhs या वेबसाइटना भेट द्यावी .
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : ऑनलाइन पद्धतीने oasis.mkcl.org/dhs या वेबसाइटवर
पाठविण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१३ .
No comments:
Post a Comment