Friday, August 30, 2013

Instructional designer job for students

विद्यार्थ्यांसाठी इन्स्ट्रक्शनल डिझायनर म्हणून चांगल्या संधी उपलब्ध


' ई - लर्निंग ' क्षेत्राचा विस्तार वाढत आहे . मात्र , या इंडस्ट्रीला गरज आहे , ती तज्ज्ञ मनुष्यबळाची . ज्यांचे इंग्रजी भाषेवर , इंग्रजी व्याकरणावर प्रभुत्त्व आहे , अशा विद्यार्थ्यांसाठी इन्स्ट्रक्शनल डिझायनर म्हणून चांगल्या संधी उपलब्ध आहेत . त्याविषयी ...

कम्प्युटर आणि त्याच्या सोबतीला आलेले इंटरनेट हे गेल्या शतकातील सर्वांत मोठे शोध आहेत . या इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानाची कवाडे सर्वांनाच खुली झाली आहेत . याच आधुनिक माध्यमाचा ' ई - लर्निंग ' स्वरूपात वापर करून शिकवणारा आभासी शिक्षक म्हणजे इन्स्ट्रक्शनल डिझायनर .

जसजशी लोकसंख्या वाढत गेली , समाजाच्या गरजा बदलत गेल्या , तसतशी अधिक शास्त्रशुद्ध शिक्षणाची गरज भासू लागली . त्यातूनच आजच्या शिक्षण व्यवस्थेचा उगम झाला . त्यामध्ये प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा , माध्यमिक शाळा , कॉलेजेस , विद्यापीठे अशी शिक्षण व्यवस्था निर्माण झाली . या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक हा एक महत्त्वाचा घटक होता आणि आजही आहे ; परंतु एकच चांगला शिक्षक व्यवस्थेमध्ये कसा पुरा पडणार ? एका विशिष्ट इयत्तेपर्यंत शिक्षकाची गरज नक्कीच आहे ; परंतु त्यापुढील कॉलेज विद्यार्थ्यांची ' सेल्फ लर्निंग ' करण्याची क्षमता विकसित झालेली असते . ई - लर्निंगमधील इन्स्ट्रक्शनल डिझाइनर नेमके हेच इंटरनेटच्या माध्यमातून चित्र , ग्राफिक्स , व्हिडिओ यांचा वापर करून शिकवत असतो . त्यासाठी त्याला माणसाची शिक्षण घेण्याची प्रोसेस काय आहे , याची माहिती असणे आवश्यक असते . शिक्षणतज्ज्ञांनी या प्रक्रियेचे काही नियम करून ठेवले आहेत . शिकवणाऱ्या शिक्षकास हे नियम आणि समीकरणे माहिती असणे आवश्यक असते . नेमके हेच शिक्षण इन्स्ट्रक्शनल डिझाइन या कोर्समध्ये शिकवले जाते . जी गोष्ट शिक्षणाची , तीच गोष्ट प्रशिक्षणाची . युद्धभूमीवरील सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रथमत : ' ई - लर्निंग ' या प्रणालीचा उपयोग केला गेला आणि तेव्हापासून आजपर्यंत ई - लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी सैन्यापासून इंडस्ट्रीपर्यंत सर्व ठिकाणी ई - लर्निंगच्या क्षेत्राने खूपच मोठी मजल मारली आहे . आज भारतामध्ये अनेक ई - लर्निंग कंपन्या यशस्वीरीत्या काम करताना दिसतात .

ई - लर्निंग कंपनीमध्ये तीन प्रमुख डिझायनर असतात . त्यातील पहिला इन्स्ट्रक्शनल डिझायनर , दुसरा ग्राफिक डिझायनर आणि तिसरा प्रोग्रॅमर . भारतामध्ये येणारे ई - लर्निंगचे काम इंग्रजी भाषेमध्ये असते . अर्थातच ' इन्स्ट्रक्शनल डिझायनर ' चे इंग्रजी भाषेवर , व्याकरणावर प्रभुत्त्व असणे गरजेचे आहे . आज ई - लर्निंग कंपन्यांमध्ये , सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये , वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये एक ट्रेनिंग डिपार्टमेंट असते आणि त्या ठिकाणी महत्त्वाचा घटक असतो , इन्स्ट्रक्शनल डिझाइन . पुण्यातील इन्स्ट ‌ िट्यूट ऑफ न्यू मीडिया डेव्हलपमेंट अँड रिसर्च (www.inmdr.net) या संस्थेमार्फत ' इन्स्ट्रक्शनल डिझाइन ' चा कोर्स चालवला जातो . दोन - अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर असा कोर्स करणाऱ्यांसाठी इंडस्ट्रीमध्ये नक्कीच जॉब उपलब्ध आहेत . विद्यापीठ अनुदान आयोग ( यूजीसी ) आणि भारतातील सर्व विद्यापीठांत आता ई -‌ लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण देता यावे , म्हणून ई - लर्निंग कोर्सेसची निर्मिती होत आहे . पुढील काही वर्षांमध्ये ई - लर्निंगद्वारे शिक्षण घेता यावे आणि ऑनलाइन प्रक्रियेतून परीक्षा देता यावी म्हणून विद्यापीठे प्रयत्नशील आहेत . ठराविक कालावधीनंतर होणारी लेखी परीक्षा , कागदावर होणारा खर्च , पेपर तपासणे आणि निकाल लावणे यात होणारी दिरंगाई , निकालातील त्रुटी या सर्व गोष्टी ' ई - लर्निंग ' च्या माध्यमामुळे कालबाह्य होतील . विद्यार्थ्याला दिलेला अभ्यासक्रम कसा आणि किती कालावधीत पूर्ण करायचा , त्यासाठी किती तास अध्यापन केले म्हणजे अध्ययन होईल , असा तास - मिनिटांचा हिशेब ' ई - लर्निंग ' मुळे कालबाह्य होईल .

एकूणात काय ' ई - लर्निंग ' चा विस्तार वाढत आहे . या इंडस्ट्रीला गरज आहे , ती तज्ज्ञ मनुष्यबळाची . ज्यांचे इंग्रजी भाषेवर , इंग्रजी व्याकरणावर प्रभुत्त्व आहे , अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जॉब मिळविण्यासाठी इन्स्ट्रक्शनल ‌ डिझाइन हा कोर्स जरूर करावा .

No comments:

Post a Comment