Jobs in banks for clerk position
बँक क्लार्क भरती
२६ राष्ट्रीयीकृत बँकांपैकी १९ बँकांमध्ये लिपिक (क्लर्क) पदासाठी सामायिक लेखी परीक्षा दरवर्षी घेतली जाते. यावर्षी १९ राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरीनेच अन्य बँका व वित्त संस्थांसाठी देखील ही परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे. परीक्षा घेण्याचे काम इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) ही संस्था करत आहे.
वयोमर्यादा- किमान : २० वर्षे , कमाल : २८ वर्षे ( अनुसूचित जाती/जमातींसाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे तर ओबीसींसाठी ३१ वर्षे इतकी आहे.)
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कम्प्युटरचे ज्ञानही आवश्यक आहे. ज्या राज्यातील परीक्षाकेंद्रांवर परीक्षा द्यायची आहे , त्या राज्याच्या राजभाषाचे ज्ञान व त्या भाषेवर प्रभुत्व आवश्यक आहे.
लेखी परीक्षेचे स्वरूप-
लेखी परीक्षा ऑनलाइन (कॉम्प्युटराइज्ड) घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रश्नपत्रिकेत पाच विभाग असून , त्यात प्रत्येक विभागामध्ये ४० गुणांसाठी ४० प्रश्न विचारले जातात. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असतो. प्रश्नपत्रिकेत रिझनिंग , इंग्रजी , न्यूमरिकल अॅबिलिटी , जनरल अवेअरनेस (विशेषत: बँकिंग संदर्भात) , संगणकज्ञान या पाच विभागांवर प्रश्न विचारले जातात. चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातात. प्रश्न इंग्रजी व हिंदी भाषेत विचारले जातात. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी १०० गुण असून , त्यामध्ये किमान ४० गुण (राखीव वर्गासाठी ३५ गुण) मिळवणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड करताना लेखी परीक्षेतील गुणांना ८० टक्के वेटेज असेल , तर मुलाखतीतील गुणांना २० टक्के वेटेज असेल. लेखी परीक्षा व मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार आयबीपीएस उमेदवारांची निवड करेल.
प्रवेश अर्ज- सामायिक लेखी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज संस्थेच्या ( www.ibps.in) वेबसाइटवर ऑनलाइन भरावे लागतील. फोटो व सही स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे. परीक्षेची फी ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरता येईल.
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत- १९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०१३
लेखी परीक्षा- ३० नोव्हेंबर व १ , ७ , ८ , १४ , १५ डिसेंबर २०१३
No comments:
Post a Comment