Friday, August 30, 2013

करिअर पाकशास्त्रातले


करिअर पाकशास्त्रातले



food-industry
पदार्थाची योग्य ती तयारी करून स्वयंपाक करण्याची कला म्हणजे पाकशास्त्र. पाककला तज्ज्ञ हा पाकशास्त्राच्या कलेत वा स्वयंपाकाच्या प्रक्रियेत कार्यरत असतो. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधील पाककला तज्ज्ञाला आपण कूक किंवा शेफ या प्रचलित नावाने ओळखतो. पाककला तज्ज्ञावर डोळ्यांना बघायला चांगला वाटेल आणि जिभेलाही आवडेल असा स्वयंपाक वा पदार्थ बनवण्याची जबाबदारी असते. पदार्थ करण्याबरोबरच पाकशास्त्रातील तज्ज्ञांना पदार्थाचे विज्ञान , आहार आणि पोषणाची समज असणे आवश्यक असते. अन्नाचे ग्रहण आणि सारणी या गोष्टी अवगत असणे म्हणजे पाककला होय. पाकशास्त्राचे स्वरुप विशिष्ट उद्योगांवर अवलंबून असते. तसेच पाककला तज्ज्ञ हा सांघिक स्वरुपात अद्ययावत उपकरणांचा वापर करून काही वेळा अधिक तास , संध्याकाळी , रात्री , आठवड्याचे शेवटचे दिवस , सुट्ट्या अशा अनियमित स्वरूपाचे काम किचनमध्ये करतो. त्यामुळे त्याचे काम काहीसे धकाधकीचे , तणावाचे आणि वेळेच्या दबावाखाली असू शकते. पाककला तज्ज्ञाच्या पगाराचे स्वरूप बऱ्याचदा कामाचे ठिकाण आणि त्याचा अनुभव यावरच अवलंबून असते.

पात्रता- या क्षेत्रात भविष्य घडवण्यासाठी वा करिअर करण्यासाठी रीतसर प्रशिक्षण आणि पाकशास्त्राचे शैक्षणिक कार्यक्रम करणे आवश्यक ठरते. हे शैक्षणिक कार्यक्रम संपूर्ण जगभरातील स्वयंपाकाचे तंत्र , त्यातील घटक यांची माहिती देतात. शिवाय स्वच्छता , टेबल व्यवस्था , व्यवस्थापन , अन्नपदार्थांची तयारी इ. गोष्टीही तेथे शिकायला मिळतात. हा अभ्यासक्रम शिकवण्याचे क्लासेसही नेहमीच्या क्लासेससारखे एक ते दोन तासाच्या लेक्चर स्वरुपात असून त्यात प्रात्यक्षिकाचाही समावेश असतो. अनेक शिक्षणसंस्था या अभ्यासक्रमावर सर्टिफीकेट आणि डिप्लोमा कोर्सेस चालवतात.

उपयुक्त व्यक्तिमत्व/स्वभाववैशिष्ट्येः
दबावाखालीही वेगाने काम करणे ,
संयम
तपशील
क्रिएटिव्ह काम करण्याची योग्यता
व्हिज्युअल कल्पनाशक्ती
कलात्मक संवेदनशीलता

संधीः या अभ्याक्रमासंदर्भातील डिग्री एकदा मिळवल्यानंतर स्पेशलायझेशनच्या या विषयात अनेक संधी उपलब्ध आहेत. पाकशास्त्रात त्या त्या विषयातील आपल्या स्पेशलायझेशननुसार आपण नोकरी शोधू शकतो.

शेफ - Shef
केटरर - Caterer म्हणजे अन्नसेवा पुरवणारा
रेस्टॉरन्ट कूक - Restaurant Cook
कार्यकारी शेफ - Manager Shef

 
अन्न आणि पेय व्यवस्थापक संस्था
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कलिनरी आर्ट , हैदराबाद 

Indian Institute of Hotel Management and Callinery Art, Hyderabad 
 
कलिनरी अॅकॅडमी ऑफ इंडिया , अफिलेटेड बाय ओस्मानिया युनिव्हर्सिटी , हैदराबाद 

Callinery Academy of India and Affiliated by Osmania Univesity
 
आयटीएम- इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट , नेरुळ , नवी मुंबई 

ITM-Institute of Htel Management, Nerul, Navi Mumbai
 
स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट , ओदिशा 

School of Hotel Management, Orissa 
 
इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट , बँगलोर 

  Institute of Hotel Managemen, Bengaluru

No comments:

Post a Comment