व्हॉट्स अॅपवर आता ‘सत्यं वद’
अरे तुझा मेसेज वाचलाच नाही, नोटिफिकेशन लवकर पाहिलेच नाही, अशी कारणं देऊन आपल्या मित्र, कुटुंबिय, ऑफिसमधले सहकारी यांना फसवत असाल तर आता तुम्हाला तसे करता येणार नाही. अशी फसवेगिरी टाळण्यासाठी व्हॉट्स अॅपने आता 'सत्यं वद'च्या तत्त्वावर नवं फिचर लॉन्च केले आहे.
व्हॉट्स अॅप केलेल मेसेज आपण अनेकदा वाचूनही न वाचल्यासारखे करतो, पण या नव्या फिचरमुळे आपण मेसेज वाचला की नाही हे समोरच्याला समजण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
व्हॉट्स अॅपवर मेसेज पाठवल्यावर आपल्याला त्या मेसेजच्या खालच्या बाजूला एक बरोबरची खूण दिसते. त्याचा अर्थ असा होतो की आपला मेसेज सर्ह्ेरवर गेला आहे. त्यानंतर तो मेसेज समोरच्या वक्तीच्या अकाउंटमध्ये पोहोचला तर त्या खाली आणखी एक बरोबरची खूण दिसते. म्हणजे एकूण दोन खूणा दिसतात. मात्र असे असले तरी आपला मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला की नाही हे कळायला काहीच मार्ग नव्हता. त्यामुळेच व्हॉट्स अॅपने नवीन फिचर आणले आहे.
यामुळे एखाद्याने मेसेज वाचला की त्या दोन खुणा 'निळ्या' रंगात दिसतील. जर एखादा मेसेज ग्रुपवर टाकला आणि तो सगळ्यांनी वाचला तरी देखील त्या दोन खुणा निळ्या दिसतील. हे फिचर आपल्याला हवे असल्यास व्हॉट्स अॅप अपडेट करावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment